धक्कादायक! देशात रोज ४१० जण गमावतात रस्ते अपघातात जीव

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचा आकडा वर्षानुवर्षे वाढतच जात आहे. २०१५मध्ये रस्ते अपघातातील मृतांचा आकडा दिवसाला ४०० एवढा होता. वर्ष २०१६ची आकडेवारीत समोर आली आहे त्यात हा आकडा दिवसाला ४१० वर पोहचला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१६ साली वर्षभरात जवळपास दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये ही आकडेवारी १.४६ लाख होती.

भारतात सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. रस्ते अपघातातील ही आकडेवारी चिंताजनक आहे. रस्ते अपघात थांबवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. २०१६च्या आकडेवारीत दिल्ली, बिहारसह ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत मृतांची आकडेवारी कमी झाली आहे. यूपी, तामीळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, प. बंगालासह ६ राज्यात या आकडेवारीत वाढ आहे. १९७०, २०१२ आणि २०१३ ही वर्ष सोडली तर रस्ते अपघातातील मृतांची आकडेवारी वाढतच गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या