लातूर जिल्ह्यात 44 नवे रुग्ण कोरोनाबाधितांची संख्या 896 वर

1794

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी 526 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 154 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर जिल्ह्यात 44 पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी तब्बल 42 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 896 वर पोहचली आहे.

लातूर जिल्ह्यात 44 नवे रुग्ण आढळले आहेत. अद्याप 154 जणांच्या स्वॅबची तपासणी होणे बाकी असल्याने ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 464 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 389 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 8184 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात 44 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नळगीर ता. उदगीर 1, जी.एम.सी. रोड लातूर 2, हरंगुळ ता. लातूर, साईधाम लातूर 3, नरके नगर लातूर 1, आनंदनगर लातूर 1, केशवनगर लातूर 1, अहमदपूर 2, भाकरवाडी ता. अहमदपूर 1, खडकपुरा औसा 2, कोरंगळा ता. औसा 1, खानंदक गल्ली औसा 2, फत्तेपूर ता. औसा 1, हंचनाळ ता. देवणी 6, सोलनगर अहमदपूर 1, बसवेश्वर चौक लातूर 1, हाजेनगर लातूर 1, सराफनगर लातूर1, हाडगा ता. निलंगा 1, शिरुर ताजबंद ता. अहमदपूर 4, चिंचोली ता. लातूर 1, औराद शहाजानी ता. निलंगा 3, पोस्ट ऑफीसजवळ निलंगा 1, बसवेश्वर नगर निलंगा 2, देसाई नगर लातूर 1, लातूर 2 यांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात कोरोनाबाधित तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्यांची संख्या आता 43 वर पोहोचली आहे. लातूर शहरातील प्रकाश नगर भागातील 68 वर्षाचा पुरुष 11 तारखेला रुग्णालयात दाखल झाला होता. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या या रुग्णाचा मृत्यू झाला. शहरातील कैलास नगर भागातील 53 वर्षाच्या पुरुष रुग्णाला 30 जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचप्रमाणे शहरातील साळे गल्ली भागातील 72 वर्षाच्या पुरुषास उपचारासाठी 8 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 43 वर पोहोचली आहे.

उदगीर येथे एकाचा सारीमुळे मृत्यू
देवणी तालुक्यातील मौजे हंचनाळ येथील 65 वर्षाच्या व्यक्तीचा बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात सारीसदृश्य आजाराने मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या