टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी राज्यात 23 जणांवर गुन्हे दाखल

690

लॉकडाऊनचा  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबरचे 450 गुन्हे दाखल झाले असून 239 व्यक्तींना अटक केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये 31 मेपर्यंत 450 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात आक्षेपार्ह व्हाट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 186 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 180 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, Tik Tok व्हिडिओ शेअरप्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 239 आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी 107 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या