जय महाराष्ट्र! राज्यातील 46 पोलिसांना ‘राष्ट्रपती पदक’

568

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशातील 946 पोलिसांना बुधवारी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले. पोलीस दलात केलेल्या शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, एसीपी मिलिंद खेतले, अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट तपास कार्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांनाही पदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृह विभागाने पोलीस दलात उल्लेखनीय, गुणवतापूर्वक कामगिरी करणाऱया देशभरातील 946 पोलीस अधिकारी-कर्मचाऱयांची यादी आज जाहीर करण्यात आली. त्यातील 89पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून त्यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी, कर्मचाऱयांचा समावेश आहे. एसीपी रामचंद्र जाधव, राजाराम पाटील, मिलिंद खेतले, हरिश्चंद्र काळे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती सूर्यवंशी अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस पदक जाहीर झालेल्या अधिकारी, कर्मचाऱयांची नावे
पोलीस अधीक्षक- सुरेशकुमार मेंगडे, विक्रम देशमाने, दिलीप बोरसटे, एसीपी- नेताजी भोपळे, किरण पाटील, अविनाश धर्माधिकारी, गोपिका जहागीरदार, मंदार धर्माधिकारी, मुपुंद हातोटे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक- राजेंद्र कदम. सय्यद साबीरअली, सतीश गायकवाड, बालाजी सोनटक्के, प्रकाश कदम, सहायक पोलीस निरीक्षक- रवीद्र बाबर, अब्दुल रौफ गणी शेख. पोलीस उपनिरीक्षक- रमेश खंडागळे, किशोर यादव, राजेंद्र पोळ, नानासाहेब मसाळ, रघुनाथ भरसट. सहायक पोलीस उपनिरीक्षक- केशव टेकाडे, रामराव राठोड. दत्तात्रय उगलमुगले, मनोहर ंिचतलू, कचरू चव्हाण, दत्तात्रय जगताप, अशोक तिडके, विश्वास ठाकरे, सुनील हरणखेडे, गोरख चव्हाण, अविनाश मराठे, खामराव वानखेडे, नितीन शिवलकर. हेड कॉन्स्टेबल- प्रभाकर पवार, अंकुश राठोड, बालू भोई, श्रीरंग सावरडे, अविनाश सातपुते, मकसूद पठाण, गणेश गोरेगावकर.

तुरुंग अधिकारी-कर्मचाऱयांना सेवा पदक
देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱयांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिकाऱयांचा यात समावेश आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे, तर भायखळा जिल्हा कारागृहाचे शिपाई जीतेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे शिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.

– चीन सीमेजवळ तैनात करण्यात आलेल्या इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (आयटीबीपी) 5 जवानांना शौर्य पुरस्कार तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएस)च्या 32 पोलिसांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या