मध्य प्रदेशमध्ये डबक्यात बुडून चार अल्पवयीन मुलींचा मृत्यू

27

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशच्या मंडला जिल्ह्यात एका डबक्यात पावसाचे पाणी साचले होते. या पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डीलवारा गावात एक खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. या डबक्यात पाच मुली आंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या. त्यापैकी चार मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक मुलगी बचावली आहे.

उर्मिला (7), सरोज मरावी (12), जोसफ सरोते (8) प्रीति धुर्व (11) अशी मृत मुलींची नावे असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तर जी मुलगी वाचली आहे तिच्यावर जवळच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. तसेच सरकारकडून मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या