गोव्यात भीषण अपघात, २ स्थानिक महिला आणि मुंबईच्या तिघांचा मृत्यू

41

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्यामध्ये आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गोव्यातील २ स्थानिक महिला आणि मुंबईच्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनल परेरा या एसएक्स-४ गाडी चालवत होत्या. पोंडाहून जुन्या गोव्याकडे जात असताना मलिक पेट्रोल पंप समोर शनल यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं ज्यामुळे गाडीने रस्त्याने चालणाऱ्या दोन महिलांना उडवलं आणि त्यानंतर गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा गाडी प्रचंड वेगात होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या अपघातामध्ये रस्त्याने चालणाऱ्या इदा क्युरोझ (वय-५५ वर्ष) लुईस मेन्झेस (वय-४८ वर्ष) यांचा मृत्यू झाला तर गाडीतून प्रवास करणाऱ्या नताली परेरा(वय-५५ वर्ष) वृषाली भोईर (वय-३५ वर्ष) आणि मनश्री भोईर (वय-४वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला

goa-accident

या अपघातामध्ये ५ जण जखमी झाले असून त्यामध्ये गाडी चालवणाऱ्या शनल परेरा (वय-३७ वर्ष) यांचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय शनॉन परेरा(वय-२ वर्ष) रूपा परेरा(वय-३५ वर्ष)  सविया परेरा(वय-१७ वर्ष) आणि सौरभ भोईर (वय-३८ वर्ष) हे देखील जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर गोवा मेडीकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या