बँकेचे स्टेटमेंट पाठविण्याच्या बहाण्याने तरुणाला पावणेपाच लाखांचा गंडा

cyber-police

अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअर ऑफिसमधून बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने तरुणाच्या नावे 4 लाख 63 हजारांचे ऑनलाईन कर्ज घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी मालोजी विठ्ठल नवले (वय 28) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालोजी एका खासगी कंपनीत कामाला असून गोखलेनगरमध्ये राहाण्यास आहेत. 25 ते 27 जुलैदरम्यान सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याची बतावणा केली. त्यांना बँकखात्याचे स्टेटमेंट पाठवून देण्याचे सांगत एक लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार मालोजी यांनी माहिती भरून पाठविली असता, सायबर चोरट्याने त्यांच्या नावे 4 लाख 63 हजारांचे कर्ज मंजूर करून घेत स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन घेतले. बँकेकडून कर्ज स्वीकारल्याचा मेसेज आल्यानंतर मालोजी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या