दिल्ली-हरियाणाच्या अनेक भागत इंटरनेट सेवा बंद, 5 कोटी यूझर्स रडकुंडीला

दिल्लीत 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलन चिघळल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली NCR मध्ये इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जवळपास 5 कोटी यूझर्सना याची झळ बसली आहे. गृहमंत्रालयाने राजधानी दिल्लीच्या अनेक भागात इंटरनेट संवा बंद ठेवली आहे. त्यामुळे यूझर्स प्रचंड त्रास सहन करावा लागला. ट्रॅक्टर रॅलीवेळी शेतकरी आंदोलन चिघळले आणि सिंघु, गाजीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि आसपासच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

असे असले तरी गृहमंत्रालयाने इंटरनेट सेवेत मोबाइल, अथवा होम ब्रॉडबँड सारख्या काही सेवा सुरू ठेवल्या असल्याचे म्हटले असले तरी यूझर्सना मात्र इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

TRAIच्या आकड्यांनुसार गेल्यावर्षी ऑक्टोबर पर्यंत दिल्लीत जवळपास 52.72 मिलियन (5.2 कोटी) मोबाइल यूझर्स आहेत. याशिवाय दिल्लीत केबल ब्रॉडबँड यूझर्सची संख्याही मोठी आहे.

गृहमंत्रालयाने केवळ इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. मात्र Jio सारख्या ओपरेटर्सचे टेलीकॉम नेटवर्क हे पूर्णपणे आयपी आधारित आहे, ज्यामध्ये वॉइस कॉल देखील नेटवर्कच्या माध्यमातून कार्यरत होतात. दिल्लीत जवळपास 5.2 कोटी यूझर्स पैकी Jio ची सेवा वापरणारे 1.88 कोटी यूझर्स आहेत. यामुळे Jio सारख्या सेवा वापरणाऱ्यांना वॉइस कॉल देखील करता येत नसल्याचे समोर आले आहे.

यासोबतच इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या अन्य कंपन्यांनी देखील पुढली सूचना मिळेपर्यंत सेवा खंडित राहणार असल्याचे मेसज ग्राहकांना पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या