रत्नागिरीत आणखी 5 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 156 वर

596

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या नव्या पाच रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 156 झाली आहे.

पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण वनझोळी या गावातील, एक रुग्ण गुहागर तालुक्यातील ताडेजंभारी येथील, एक रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील पांगरी देवरूख येथील तर एक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ येथील आहे. यापूर्वी कळंबणी येथील सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खेड तालुक्यातील एकाच कुटूंबातील चार जणांना कोरोनाची बाधा झाली होती.आणखी दोन रूग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. तेदेखील खेड तालुक्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 156 इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या