5 मिनिटांत म्हटले 30 संस्कृत श्लोक! पुण्यातील माहिकाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली दखल

संस्कृतमधील श्लोक लक्षात ठेवणे  भल्याभल्यांना शक्य होत नाही. पुण्यात राहणाऱया माहिका पोतनीस या पाच वर्षांच्या चिमुरडीने मात्र कमाल करून दाखवली आहे. तिने अवघ्या पाच मिनिटांत 30 संस्कृतचे श्लोक म्हटले आहेत. तिच्या या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे.

याबाबत माहिकाची आई सारिका पोतनीस म्हणाल्या, माहिका रोज सकाळी भगवद्गीतेचे श्लोक वाचण्याचा प्रयत्न करायची. त्यामुळे मला तिची आवड समजली. संस्कृत श्लोकाचे पठण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मी तिला प्रोत्साहन दिले. श्लोक पठण करतानाचा तिचा व्हिडिओ शूट करून मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवला होता. त्यांनी तिची दखल घेतली आहे. लहान असूनही ती संस्कृतमधील श्लोकांचे व्यवस्थित उच्चार करते.

आपली प्रतिक्रिया द्या