पन्नास दिवस चालणारा फोन लाँच

15

सामना ऑनलाईन । मुंबई

मोबाईल फोन कंपनी झिवीने नुकताच एक नवीन फोन लाँच केला आहे. सुमो टी३००० असं नाव असलेला हा फोन पूर्ण चार्ज केल्यानंतर ५० दिवस चालतो, असा दावा या कंपनीने केला आहे. झिवी मोबाईल्सचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या फोनमध्ये एक शक्तिशाली बॅटरी बसवण्यात आली आहे. ज्यामुळे हा फोन वारंवार चार्ज करावा लागणार नाही. या फोनची किंमत १,४९० रुपये आहे.
या व्यतिरिक्त फोनची स्क्रीन काही कारणांमुळे फुटल्यास स्क्रीन बदलून मिळू शकेल. या फोनमुळे ग्रामीण भागातल्या ग्राहकांसाठी फायदा होणार आहे.

हे आहेत या फोनचे फीचर्स-
२.८ इंचाचा डिस्प्ले
५० दिवस चालणारी बॅटरी
फीचर कॅमेरा विथ फ्लॅश
ऑटो कॉल रेकॉर्ड
मोबाईल ट्रॅकर
टच लाईट
जीपीआरएस सिस्टिम

आपली प्रतिक्रिया द्या