गडचिरोली जिल्ह्यात 500 रुग्णांची कोरोनावर मात; 143 अॅक्टिव्ह रुग्ण

768

गडचिरोली जिल्हयात मंगळवारी नवे 13 कोरोनाबाधित आढळून आले, तर 2 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामूळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 143 झाली आहे. तसेच एकूण कोरोनामुक्त रूग्णांचा आकडा 500 वर गेला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 644 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये चामोर्शी व एटापल्ली येथील रुग्णांचा समावेश आहे. तर नवीन 13 कोरोनाबाधितांमध्ये आरमोरी येथील 3 एसआरपीएफ, गडचिरोली येथील 1 सीआरपीएफ व 1 एसआरपीएफ जवान, एटापल्ली येथील 1 पोलीस, जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरातील 1 नर्स, 1 रूग्ण, कोरोनाबाधित असलेल्या रूग्णाच्या संपर्कातील व विलगीकरणत ठेवलेल्या 4 जणांचे व मेडिकल कॉलनीतील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या