रत्नागिरीत पकडल्या 51 लाखांच्या नव्या नोटा

101

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे एका इनोव्हा मध्ये 51 लाखाची रोकड रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पकडली.ही रोकड तीन प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये दोन हजारच्या नव्या कोऱया नोटांची होती.पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून या नोटा कुठून आणल्या याची चौकशी सुरु असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी सांगितले.

rokad-police

खारेपाटण हून चिपळूण च्या दिशेने निघालेल्या इनोव्हा गाडी क्र.एमएच 07 एडी 4786 गाडीमध्ये मोठया प्रमाणात रक्कम असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली.पोलीस निरीक्षक अनिल विभूते  यांच्या नेतृत्वालखाली हातखंबा येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही इनोव्हा गाडी पोलीसांनी पकडली.यागाडीमध्ये तीन प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये मिळून 51 लाख रुपये सापडले आहेत.पोलीसांनी हि रक्कम ताब्यात घेतली आहे.गाडीमध्ये रफीक उस्मान नाईक, विनोद सुरेश हिंदुजा,मुकेश रिजवानी, भरत भानुशाली, मनिष रिजवानी आणि चालक संतोष शिंदे हे सहा जण असल्याचे महिती देताना जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक म्हणाले की, आज बँकेमध्ये नव्या नोटा कमी प्रमाणात मिळत असताना इतक्या रक्कमेच्या दोन हजाराच्या नोटा आणल्या कुठून याबाबत आम्ही चौकशी करणार असून पुढील कारवाई आयकर विभाग करेल असे सांगितले.यावेळी पोलीस निरीक्षक एस.एल.पाटील, अनिल विभूते उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या