लातूर जिल्ह्याला दिलासा; 54 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, 3 जणांचे अहवाल अनिर्णित

859

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सोमवारी लातूर जिल्ह्यातील 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील 54 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3 जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. सलग दोन दिवस लातूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 12 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3 व्यक्तीचे अहवाल अनिर्णित आले आहेत. लातूर मोती नगर येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात 28 व्यक्ती आल्या होत्या. त्या सर्व 28 जणांच्या स्वॅबची तपासणी केली असता निकटवर्तीय व संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही दिलासादायक बाब आहे. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथून 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असून त्यापैकी सर्वच 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रेणापूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता. त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे लातूर जिल्ह्यातून एकूण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 54 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3 जणांचे अहवाल अनिर्णित आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या