रत्नागिरी-सिंधुदुर्गात पाच वाजेपर्यंत 55.37 टक्के मतदान

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून १९४२ मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४ लाख ५४ हजार ५२४ मतदारांपैकी ८ लाख ५ हजार ३७० मतदारांनी हक्क बजावला.एक वाजे पर्यंत ५५.३७ टक्के मतदान झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १४ लाख ५४ हजार ५२४ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ७ लाख ४२ हजार ४७८ महिला आणि ७ लाख १२ हजार ३४ पुरुष मतदार आहेत.१२ इतर मतदार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन तासात १ लाख ४९ हजार ३४९ मतदारांनी आपला हक्क बजावला.