सासऱ्याने केला सुनेचा बलात्कार, मुलाने जाब विचारल्यावर त्याचीही केली हत्या

उत्तर प्रदेशमधील बरेली शहरात एका नराधम व्यक्तीने त्याच्या सुनेवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याबाबत त्याला जाब विचाऱणाऱ्या मुलाचीही त्याने गोळ्या घालून हत्या केली आहे. बरेलीतील माजोळा गावात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे.

राकेश (56) हा त्याची पत्नी, दोन मुलगे व एका सुनेसोबत माजोळा गावात राहायचे. 25 नोव्हेंबरच्या रात्री राकेश व त्याची सुन दोघेच घरात होते. इतर कुटुंबीय एका लग्नासाठी दुसऱ्या गावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत राकेशने त्याच्या सुनेवर बलात्कार केला. पीडितेने तिचा पती व सासू घरी परतल्यानंतर याबाबत त्यांना सांगितले. वडिलांनीच आपल्या बायकोवर बलात्कार केल्याचे समजताच मुलगा भयंकर चिडला व त्याने वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्या दोघांत वाद झाला. त्यावरून चिडलेल्या राकेशने त्याच्याकडील बंदुकीने मुलावर गोळ्या झाडल्या. यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या