मुंबईत एकाच दिवसात 5 हजार 903 कोरोनामुक्त,  1554 नवे रुग्ण

1049

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1 हजार 554 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 57 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5 हजार 903 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 50 हजार 694 वर पोहोचली आहे.

मुंबईतील गेल्या 48 तासांत 57 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4686 झाली आहे. 43 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण रुग्णांपैकी 31 पुरुष तर 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 जणांचे वय हे 40 वर्षाखाली होते, 34 जणांचे वय हे 60 वर्षांवर होते तर उर्वरित 19 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. मुंबईत सध्या कोरोनाचे 24 हजार 882 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट हा 42 दिवसांवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या