57 वर्षांच्या अभिनेत्याने केलं 26 वर्षांच्या तरुणीशी पाचवं लग्न, फोटो व्हायरल

एका 57 वर्षांच्या अभिनेत्याने 26 वर्षांच्या तरुणीशी पाचवा विवाह रचल्याचं वृत्त आहे. या विवाहाचे फोटोही व्हायरल होत आहेत.

या अभिनेत्याचं नाव निकोलस केज असं आहे. निकोलसने त्याच्याहून 31 वर्षांनी असलेल्या रीको शिबाटा या जपानी प्रेयसीसोबत पाचवा विवाह केला आहे. निकोलस केज हा अभिनेता हॉलिवूडमधील घोस्ट रायडर या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष ओळखला जातो.

nikolas-riko-wedding

हा विवाह सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने लासवेगस येथे पार पडला. या लग्न सोहळ्यात निकोलसची पूर्वाश्रमीची पत्नी ऐलिस ही देखील सहभागी झाली होती. तिच्यासोबत निकोलसचा मुलगा कॅल हा सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होता.

निकोलस आणि रीको यांची भेट जपान येथील शीगा येथे झाली होती. गेल्या वर्षभरापासून ते एका नात्यात होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या