चहावाल्याकडे २ लाख रूपयांची उधारी…मुंबई काँग्रेसचा कॅशलेस व्यवहार

सामना ऑनलाईन। मुंबई

काँग्रेस पक्ष सध्या केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेविरोधात आक्रमक झालेला बघायला मिळतोय. मात्र दुसरीकडे याच काँग्रेसच्या मुंबई विभागाने गेल्या काही महिन्यांपासून कॅशलेस व्यवहारांना सुरूवात केलेली दिसतेय, कारण मुंबई काँग्रेसने एका चहावाल्याकडून चहा तर प्यायला मात्र त्यासाठी त्याचे २ लाख रूपये दिलेच नाहीत. केंद्रात आणि राज्यात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसने अशी चिंधीगिरी का करावी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

congress-logo

मुंबईतील आझाद मैदानाजवळ मुंबई काँग्रेसचं ऑफीस आहे आणि इथेच इंदर जोशी नावाच्या चहावाल्याचं दुकानही आहे. इंदरने सांगितलं की त्याच्याकडे मुंबई काँग्रेसची २ लाखांची उधारी आहे, कारण त्याने चहा तर दिले मात्र त्याचे पैसेच त्याला मिळाले नाही. उधारी न मिळाल्याने इंदरने आता काँग्रेसवाल्यांना चहा देणं बंद केलंय.

एका इंग्रजी वृत्तपत्राने या उधारी बाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की “काही आठवड्यांपूर्वीच मला या उधारीबाबत कळालं, पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यामुळे ही उधारी झाली आहे. आम्हाला त्या चहावाल्याला ४ लाख रूपये द्यायचे होते त्यातले २ लाख आम्ही दिलेले आहेत, उरलेले पैसे पण लवकरच देऊन टाकू. जवळपास चार महिने त्याला पैसे मिळाले नाहीयेत, ते मिळतीय याची आम्ही काळची घेऊ”