बीडच्या 200 खाटांच्या रूग्णालयासाठी 58 कोटी 21 लाख रूपये मंजूर!

401

गेल्या 4 वर्षांपासून बीड येथील सरकारी रूग्णालयाच्या शेजारी नवीन रूग्णालयाला मंजूरी मिळावी तसेच बीड येथे आणखी 3 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावेत व त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी ना.जयदत्त क्षीरसागर यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज बीड येथील नवीन 200 खाटांच्या रूग्णालयाला अंतिम मंजूरी मिळाली आहे.

बीड मतदारसंघातील वाढत्या लोकसंख्येचा आणि ठिकठिकाणच्या नागरीकांच्या मागणीनुसार बीडच्या सरकारी दवाखान्याच्या शेजारी नवीन 200 खाटांच्या रूग्णालयाला मंजूरी मिळावी यासाठी ना.जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या चार वर्षांपासून शासन दरबारी अविरतपणे पाठपुरावा ठेवला होता. या रूग्णालयाला मंजूरीही मिळाली होती मात्र हे रखडलेले काम आज प्रत्यक्षात पूर्णत्वास गेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीडच्या 200 खाटाच्या नवीन रूग्णालयाला आज प्रत्यक्षात निधीसह मंजूरी मिळाली. यासाठी 58 कोटी 21 लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली असून याचबरोबर रायमोहा ग्रामीण रूग्णालयाच्या नवीन बांधकामासाठीदेखील जयदत्त क्षीरसागर यांनी निधीची आग्रही मागणी केली होती त्यानुसार 13 कोटी 52 लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांनी चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात करावे, ईट येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे आणि बीड शहरात आणखी 3 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे अशी मागणी केली होती त्यानुसार या मागणीलाही अंतिम टप्प्यात मंजूरी मिळेल जयदत्त क्षीरसागर यांनी अविरतपणे आरोग्याच्या प्रश्‍नावर पाठपुरावा केल्यामुळे बीड मतदारसंघातील रूग्णालयाचे प्रश्‍न आता मार्गी लागले आहेत. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सहकार्य केल्यामुळे हे प्रश्‍न मार्गी लागल्याचे ना.जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या