शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषात षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. शिवसेनेचा तोच दरारा आणि धाक यावेळी दिसला. या सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक, आगामी विधानसभा निवडणूक यावर सडेतोड भूमिका मांडताना भाजप आणि मिंधेंची सालटी काढली. उद्धव ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणावर शिवसैनिकांनी टाळया आणि जयघोषाने षण्मुखानंद दणाणून सोडले.