कोरोनाला रोखण्यासाठी चर्चमध्ये डेटॉल पाजले, 59 जणांचा मृत्यू

13106

दक्षिण आफ्रिकेचा कथित धर्मगुरू रुफस फाला याने कोरोनाव्हायरसला प्रतिबंधक औषध आणि चर्चवरील विश्वास दर्शविण्यासाठी म्हणून चर्चमधील सदस्यांना ब्लीच, डेटॉल पाजले. डेटॉल प्यायल्यानंतर त्यातील 59 जणांचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित धर्मगुरूने आपल्या अनुयायांना असा विश्वास दिला होता की, डेटॉल त्यांना प्राणघातक कोरोनाव्हायरस आणि इतर कोणत्याही आजारांपासून दूर ठेवेल. आधीच वेगवेगळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना जंतुनाशकांद्वारे बरे करण्याचे आश्वासन दिले गेले होते. अलीकडेच, त्यानेच आपल्या चर्चमधील सदस्यांना डेटॉल प्यायला लावले, आणि त्यामुळे आजार बरे होतील असे सांगितले. डेली सनने हे वृत्त प्रसिद्ध केले होते.

कथित धर्मगुरू रुफस याने सांगितले की “मला माहित आहे डेटॉल हानिकारक आहे, परंतु देवाने मला ते वापरण्यास सांगितले. ते पिणारा मी पहिला होता, ”असा दावा त्याने केला आहे. तसेच डेटॉल प्यायल्याने बरे झाल्याचे अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केल्याचा दावाही त्यांने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या