ठाण्यात हरवलेले ५८ मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश

71

सामना ऑनलाईन, ठाणे

एकदा का मोबाईल हरवला तर तो परत मिळेल याची काही शाश्वती नसते. शहरात रोज अशा अनेक घटना घडत असतात. मात्र ठाण्याच्या परिमंडळ-१ च्या पोलीस उपआयुक्तांनी मोबाईल शोधासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांनी हाती घेतलेल्या शोधकार्यात तब्बल ५८ मोबाईलचा शोध लागला आहे. यामुळे मोबाईल चोरीला गेला तरी तो परत मिळेल याची खात्री आता ठाणेकरांना वाटत आहे.

ठाणे परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त अभिषेक त्रिमुखे यांन मोबाईल चोरीच्या घटनेता होणारी वाढ लक्षात घेऊन मोबाईल शोधासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक देखमुख, पोलीस उपनिरिक्षक केकाण, जाधव, वारघडे, घुगे यांच्या पथकाने गेल्या चार महिन्यातील मोबाईल चोरी किंवा हरवलेल्या तक्रारींचा मागोवा घेत तब्बल ५८ मोबाईलचा शोध लावला आहे. या ५८ मोबाईलची साधारण किंमत ५ लाख ७० हजार इतकी आहे. हरवलेला मोबाईल कधीही परत मिळणार नाहीत अशी समज असलेल्या ठाणेकरांना यानिमित्ताने सुखद धक्का मिळाला असून परिमंडळातील पोलीस स्टेशनमार्फत संबंधित तक्रारदारांना त्यांचा मोबाईल परत करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या