देशात ६ कोटी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली

19
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शेतकऱ्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे. देशात ९ कोटी शेतकरी कुटुंबे असून यातील तब्बल ६.३ कोटी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. कर्जबाजारीपणामुळेच १९९५ पासून गेल्या २३ वर्षांत ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ७६ हजार शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.

‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो’च्या अहवालानुसार ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २००५ ते २०१५ या दहा वर्षांत देशात एक लाख लोकसंख्येमागे १.४ ते १.८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सततची नापिकी, लहरी हवामान, कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्यातील गेल्या तीन वर्षांतील शेतकऱ्यांची आंदोलने
शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत राज्यात विविध प्रकारे आंदोलने केली. यात महामुक्काम सत्याग्रहापासून संप ते मोर्चा यांचा समावेश होता. अशा विविध मार्गानी जेव्हा शेतकरी पेटून उठला तेव्हा सरकारला चांगलेच जेरीस आणले.

मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह.
मे २०१६ रोजी ठाणे शहरातील हजारो शेतकऱ्यांचा तिरडी मोर्चा.
ऑक्टोबर २०१६ मध्ये पालघर जिह्यातील वाडा येथे शेतकऱ्यांचा आदिवासी विकासमंत्र्यांच्या घराला दोन दिवस महाघेराव.
जून २०१७ चा ऐतिहासिक शेतकरी संप.
मार्च २०१८ मधील शेतकऱ्यांचा भव्य ऐतिहासिक मोर्चा.

आपली प्रतिक्रिया द्या