खारफुटीच्या जंगलांना ६ कोटींचे कुंपण

18

कुलाबा, वरळी, मालवणीतले अतिक्रमण रोखणार
मुंबई – मुंबईची फुप्फुसे असलेली खारफुटीची जंगले वाचविण्यासाठी धोरण ठरविण्यात आले आहे. याअंतर्गत कुलाबा, वरळी आणि मालवणी भागातील खारफुटी वाचविण्यासाठी या परिसरात तारांचे कुंपण घालण्यात येणार आहे. यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
कुलाबा, वरळी आणि मालवणी या परिसरात खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण रोखण्यासाठी खारफुटीच्या परिसरात तारेचे कुंपण उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या निधीपैकी ३ कोटी रुपये मिळाले आहेत. प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार असल्याचे मुख्य वन अधिकारी (खारफुटी) एन. वासुदेवन यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी पहिला टप्पा सुरू
यासाठी सहा कोटींचा खर्च असून तीन कोटी रुपये पावसाळ्यापूर्वी वापरले जाणार आहेत. हा पहिल्या टप्प्यासाठीचा खर्च असून यासाठीचा प्रस्ताव मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मंजूर करण्यात आला होता, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या