आंध्र प्रदेशात विषारी गॅस गळतीने सहा जणांचा मृत्यू

36

सामना ऑनलाईन । अनंतपूर

आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे स्टील कारखान्यात विषारी गॅस गळती झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृति गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गंभीर स्थितीमध्ये असणाऱ्या पाचही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गॅस गळतीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूर येथील ताडीपत्री भागात असणाऱ्या गेर्दाऊ स्टील इंडिया लिमिटेड या कारखान्यात ही विषारी वायूची गळती झाली आहे. गॅस गळतीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या