भाच्यासमोर महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ शूट करून केला व्हायरल

राजस्थानमध्ये एका 45 वर्षीय महिलेवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला असून त्याचा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला आहे. अलवर जिल्ह्यातील तिजारा गावात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

‘गुरुवारी पीडित महिला ही तिच्या भाच्यासोबत एका कामानिमित्त दुसऱ्या गावी गेली होती. तिथून परत येत असताना त्यांना या सहा नराधमांनी रोखले. त्यानंतर त्या महिलेवर भाच्यासमोरच सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व त्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ अनेकांना व्हॉट्सअॅपवप पाठवला. पीडित महिलेने घडलेली घटना तिच्या नवऱ्याला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आतापर्यंत या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर इतर चौघांचा शोध सुरू आहे’, असे तिजाराचे पोलीस अधिकारी कुशल सिंग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या