महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील 6 मंत्र्यांना डच्चू, वाचा कोण आहेत हे मंत्री

3237

सामना ऑनलाईन, मुंबई

गेले अनेक दिवस ज्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होती तो विस्तार आज अखेर पार पडला. रविवारी 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा संपताच 6 विद्यमान मंत्र्यांनी मंत्रीपदाचे राजीनामे दिल्याची बातमी धडकली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की या मंत्र्यांनी संघटनेसाठी काम करण्याची इच्छा दाखवली ज्यामुळे त्यांनी राजीनामे देताच ते तत्काळ स्वीकारण्यात आले. या मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारल्यानेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकला अशी माहितीही त्यांनी दिली.

राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागरांसह 13 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

 

ज्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे त्यामध्ये एमपी मिल एसआरए प्रकल्पावरून अडचणीत आलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे प्रवीण पोटे-पाटील आमि अंबरीश राजे अत्राम यांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि खराब कामगिरीचा ठपका ठेवत या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी कोणाला नेमलं जातं याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या