अमरावतीत 6 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 218 वर

454

अमरावतीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 218 वर पोहचली आहे. तर आतापर्ंयत 120 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. ही दिलासादायक बाब असली तरी रविवारी सकाळी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 218 झाली आहे.

सध्या रुग्णालयात 75 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यात बडनेरा येथील 30 वर्षीय, 29 वर्षीय व 31 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. उर्वरित 58 वर्षीय पुरूष बुधवारा, 34 वर्षीय पुरूष अंबागेट व 45 वर्षीय पुरूष हबीबनगर येथील आहे. बडनेरा येथे आढळून आलेले तीन कोरोनाबाधित रेल्वे पोलीस दलातील जवान आहेत. ते तिघेही नागपूर येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जवाणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी हे तिघेजण असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या 218 रुग्णांपैकी 120 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. तर 15 जण कोरोनामुळे दगावले आहे. नागपूर येथे 3 जणांना उपचारार्थ पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका जणाला सुटी देण्यात आली आहे. सध्या दवाखान्यात 75 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या