पाकिस्तानच्या लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 6 अधिकारी ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा लष्करी अधिकाऱयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मेजर आणि ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या तीन कमांडोंचा समावेश आहे. बलुचिस्तानातील हरनाई भागात एका उड्डाण मोहिमेदरम्यान हा अपघात झाला आहे. पाकिस्तान लष्कराने या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नाही.