रायगड जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक जाहीर

638

रायगड जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांना कठीण आणि खडतर कामगिरी केल्याबद्दल तर 36 वर्षे राष्ट्रीय सणाच्यावेळी ध्वज बांधण्याचे विधीवत काम करणारे अधिकारी याना महासंचालक पोलीस यांच्यामार्फत विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. या सहा अधिकाऱ्याना प्रजासत्ताक दिन सोहळ्यावेळी पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पदक देवून गौरवण्यात येणार आहे.

shinde

pawar

jagambangar

पेण पोलीस विभागीय अधिकारी नितीन जाधव, रोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, एमआयडीसी महाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक फौजदार विलास जंगम यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पेण पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन जाधव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व मुलचेरा या नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्षे पाच दिवस समाधानकारक व यशस्वी सेवापूर्ण केली असून या दरम्यान त्यांनी 10 नक्षलवादी व नक्षल समर्थकांना अटक केली असून 30 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण केले आहे. याबाबत नितीन जाधव यांना पदक जाहीर झाले आहे. पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी डुग्गीपार, केशोरी अर्जुनी मोर या भागात तर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात दोन वर्षाहून अधिककाळ समाधानकारक आणि यशस्वीपणे सेवापूर्ण केल्याबद्दल विशेष सेवापदक जाहीर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील नक्षल ऑपरेशन दरम्यान वासने घाट जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटके शोधून निष्क्रिय केल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

jadhav

gawade

जिल्हा पोलीस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार विलास जंगम हे 1984 पासून ते आजपर्यंत सुमारे 36 वर्षे पोलीस मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस अधिक्षक व निवासस्थान, जिल्हा कोषागार, जिल्हा कारागृह इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन इत्यादी राष्ट्रीय सणाच्या वेळी ध्वज बांधण्याचे विधीवत काम अविरत व चोखपणे करत असल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या