‘तोयबा’चे 6 दहशतवादी श्रीलंकामार्गे तामीळनाडूत, राज्यात हाय अलर्ट

386
terriorist
प्रातिनिधीक फोटो

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आलेल्या हिंदुस्थानी सैन्यामुळे पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा नवा मार्ग पाकिस्तानी दहशतवाद्यांनी शोधून काढला आहे. श्रीलंकेतून समुद्राच्या मार्गाने तामीळनाडूत ‘लष्कर-ए-तोयबा’चे सहा दहशतवादी घुसले असल्याचा गुप्तचर विभागाने म्हटले आहे. त्यामुळे तामीळनाडूमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

साधूंची वेशभूषा
श्रीलंकेच्या मार्गाने तामीळनाडूत घुसलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी तर एक श्रीलंकन तमिळ आहे. त्यांनी हिंदूंची वेशभूषा केली आहे. भगवी वस्त्र, गळय़ात माळा, कपाळावर टिळा आणि भस्म लावून हे दहशतवादी फिरत आहेत. खबरदारीच्या उपाय म्हणून पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून शहरांच्या प्रमुख भागांत धडक कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. श्रीलंकेतील काही नागरिकांच्या मदतीने हे दहशतवादी या भागात सागरी मार्गाने घुसले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या