नाना-बापूंच्या मैत्रीची षष्ठ्यब्दी..

26

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

ज्येष्ठ विचारवंत न्या.नरेंद्र चपळगावकर आणि प्रसिद्ध  समिक्षक डॉ.सुधीर रसाळ यांच्या जीवलग   मैत्रीला ६० वर्षे  पूर्ण  झाल्याबद्दल त्यांच्या सुह्रद व चाहत्यांनी शनीवारी संभाजीनगरात नाना आणि बापूंच्या मैत्रीची षष्ठ्यब्दी साजरी केली . या अनोख्या सोहळ्यात नानांनी रसाळांची आणि बापूंनी  चपळगावकरांची उत्स्फूर्त प्रकट मुलाखत घेतली.दोघांनीही एकमेकांना चांगलेच बोलते केले. आठवणींचा जुना खजिना दोघांनीही मुक्त हस्ते उघडल्यामुळे उपस्थितांनीही या गप्पांचा मनमुराद आनंद  घेतला.मराठी साहित्य हा दोघांच्याही मैत्रीचा समान धागा.साहित्यातील मुशाफिरीसोबतच दोघांनीही व्यक्तीगत आयुष्यातील जुने किस्से, स्वभाववैशिष्ट्यातील गमती जमती मनमोकळेपणे सांगून गप्पांच्या मैफलीत  चांगलीच खसखस पिकवली.

आपली प्रतिक्रिया द्या