पाच मुलांची आजी असलेल्या महिलेचे 22 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध

2422

प्रेमाला वयाचे बंधन नसते असे बोलले जाते. याच म्हणीला साजेशे एक प्रेमप्रकरण उत्तर प्रदेशमध्ये समोर आले आहे. आग्रा जिल्ह्यातील एक 22 वर्षीय तरुण हा 60 वर्षांच्या महिलेच्या प्रेमात पडला आहे. या दोघांनी एकमेकांशीच लग्न करण्याचा हट्ट धरला आहे.

आग्रा शहरातील प्रकाश नगर येथे महिला ही 60 वर्षांची असून ती सात मुलांची आई असून त्यांना देखील पाच मुलं देखील आहेत. पाच मुलांची आजी असलेली ही महिला तिच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. ते दोघे लग्न करण्यासाठी पळून देखील गेले होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पकडून आणले. या महिलेचा पती व तरुणाचे आई बाप या प्रकारामुळे हैराण झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या