साडे पाच वाजेपर्यंत तिसर्‍या टप्प्यासाठी देशात 61 टक्के मतदान, महाराष्ट्रात 55 टक्के

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्यासाठी116 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण 61.31 टक्के मतदान झाले. तर राज्यात 55 टक्के मतदान झाले आहे.

सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले तिथे मतदानाचे प्रमाण 78.94 टक्के इतके होते. तर त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये 7४.05 टक्के त्याखालोखाल गोव्यामध्ये 70.96 टक्के मतदान झाले आहे.