रस्त्यात पाय पकडून माफ करा बोलला… आणि 45 हजार घेऊन पळाला

914

चोरी करण्यासाठी चोरटे कोणताही बहाणा करण्यास मागेपुढे पाहत नाही. अशीच एक घटना बंडगार्डन रस्त्यावर घडली आहे. रस्त्याने चाललेल्या एका जेष्ठ नागरिकाला चोरट्याने धक्का दिला. त्यानंतर त्याने जेष्ठ नागरिकाचे पाय धरून माफी मागण्याचा बहाणा करून त्यांच्या खिशातील तब्बल 45 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन रस्त्यावरील डेकॉर शोरुमसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी ईश्वर अल्गुर (वय 61 वर्ष) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर काल घरातील 45 हजारांची रोकड घेउन सोसायटीत जमा करण्यासाठी रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्यांना लाथ मारली. त्यानंतर चोरट्याने ईश्वर यांच्या जवळ जाउन काका मला माफ करा, लाथ चूकून लागली असे म्हणत त्यांचे पाय धरले. त्यावेळी ईश्वर खाली वाकले असता, चोरट्याने त्यांच्या खिशातील 45 हजारांची रोकड चोरून पसार झाला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या