काबूलमध्ये लग्नसमारंभात बॉम्बस्फोट; 63 ठार, 180हून अधिक जखमी

421
फोटो प्रातिनिधिक

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरात शनिवारी रात्री झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात किमान 63 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट एका लग्नसमारंभात घडवण्यात आला. या ठिकाणी शेकडो लोकांची उपस्थिती होती. स्फोटानंतर 180 हून अधिकजण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातही जखमींपैकी अनेकजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मीडिया रिपोर्टस्नुसार ही घटना शनिवारी रात्री लग्नसमारंभ सुरू असताना घडली. लग्नाच्या पार्टीत एक आत्मघाती हल्लेखोर घुसला आणि कंबरेला बांधलेले स्विच दाबले. ही घटना राजधानीतील शिया मुस्लिमबहुल भागात घडली. अफगाणिस्तानच्या शियाबहुल भागांमध्ये प्रामुख्याने तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतकाद्यांकडून हल्ले घडकिले जातात.

‘आयएस’ने स्वीकारली जबाबदारी
बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने स्वीकारली. सुरक्षा दले समारंभात आली असताना तेथे पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणला असा संदेश ‘इस्लामिक स्टेट’ने ‘टेलिग्राम’ ऍपद्वारे दिला.

आपली प्रतिक्रिया द्या