उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 64.22 टक्के मतदान

सामना ऑनलाईन, लखनऊ

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी पूर्ण झालं. पहिल्या टप्प्यात 64.22 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं. सकाळी 8 पासून मतदानाला सुरूवा झाली होती आणि सकाळपासूनच प्रत्यक मतदानकेंद्रावर बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळत होती. 2012साली झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 61 टक्के मतदान झालं होतं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी जरी यंदा वाढली असली तरी गोवा आणि पंजाबच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं आहे. गोव्यामध्ये 83 टक्के तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान झालं होतं.

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिला टप्पा शनिवारी पार पडला. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 15 फेब्रुवारीला होणार आहे. आज ज्या 73 जागांसाठी मतदान झालं जागांवर ज्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यांची नावे पाहूयात

नोएडा- पंकज सिंह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा

मेरठ-भाजपाचे माजी उत्तर प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी

सरधना-वादग्रस्त भाजपा आमदार संगीत सोम विरूद्ध अखिलेश यांचे निकटवर्तीय अतुल प्रधान

आपली प्रतिक्रिया द्या