रत्नागिरीत 66 नवे रुग्ण आढळले; सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

531

रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत 41 तर आरटीपीसीआर चाचणीत 25 असे एकूण 66 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली आहे. तर शनिवारी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खिंडी येथील 65 वर्षीय रुग्णाचा तसेच डोकलवाडी येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. खेड तालुक्यातील भोस्ते येथील 65 महिला रुग्ण, खेड येथील 55 वर्षीय रुग्ण, आणि लोटे येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दाभोळ, दापोली येथील 73 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील 72 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 101 झाली आहे. शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून 3, कामथे रुग्णालयातून 1 आणि 3 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1788 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या