संभाजीनगरमध्ये 50 टक्के रुग्ण बरे झाले, आतापर्यंत 679 रुग्ण कोरोनामुक्त

783

संभाजीनगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असलेतरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1279 बाधित रुग्णांपैकी 679 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर गेले असून नागरिकांनी कोरोनाला घाबरुन जाण्याचे आवश्यकता नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने 15 ते 20 मे दरम्यान सहा दिवसाचा कडक लॉकडाऊन पाळला. यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. पंधरा दिवसापासून सलग 50 ते 90 च्या दरम्यान रोज रुग्णांची संख्या वाढत होती. आता तीन दिवसात ही संख्या 25 ते 35 वर आली आहे. शहरातील 9 कोविड रुग्णालयात बाधित रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर दहा दिवस उपचार करुन त्यांना घरी पाठवले जात आहे. आतापर्यंत बाधित 1279 रुग्णापैकी 679 बाधितांवर उपचार केल्यामुळे ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

रविवारी 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये घाटी रुग्णालय 3, जिल्हा सामान्य रुग्णालय 14, एमजीएम रुग्णालय 5, धूत हॉस्पीटल 1, मनपाचे कोविड केअर सेंटर असलेल्या एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स 4, एमआयटी वसतीगृह 9, किलेअर्फ 24, इओसी पदमपूरा 8 अशा 68 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या