बुलढाणा जिल्ह्यात 7 नवे रुग्ण आढळले; 94 अहवाल कोरोना निगेटिव्ह

corona-virus-new-lates

बुलढाण्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 101 अहवाल मिळाले आहेत. यापैकी 94 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये खामगाव येथील 18 वर्षीय महिला व 32 वर्षीय महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 35 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 24 वर्षीय महिला, बुलढाणा येथील 19 वर्षीय तरूण व माळवडी (ता. बुलढाणा) येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आतापर्यंत 2792 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 154 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 154 आहे. तसेच गुरुवारी 101 अहवाल मिळाले आहेत. त्यामध्ये 7 पॉझिटिव्ह, तर 94 निगेटिव्ह आले आहेत. तर 293 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात सध्या एकूण 260 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 94 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या