विजेची तार तुटल्याने सात ट्रॅव्हल्स बस जळून खाक

लातूर शहरातील रिंग रोडवरील गॅरेज मध्ये उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या आहेत. विजेची तार तुटल्यामुळे या बसेस आग लागून जळाल्या. या दुर्घटनेत सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रिंग रोडवरील सना गॅरेज येथे बंद पडलेल्या तीन ट्रॅव्हल्स थांबून होत्या. तर चार ट्रॅव्हल्स बस दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास महावितरणची विजेची तार तुटून पडल्यामुळे ट्रॅव्हल्स बसने पेट घेतला आणि या आगीत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स बस जाळून खाक झाल्या. लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाने ही आग विझवली. या आगीत सुमारे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेबाबत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.