दसरा उत्सवाचे ठळक वैशिष्ट्य असलेल्या बन्नी उत्सवाला गालबोट लावणारी घटना रविवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात घडली. उत्सवादरम्यान झालेल्या दोन गटात झालेल्या हिंसाचारात 70 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
कुर्नूल जिल्ह्यातील देवरगट्टू गावात दसरा उत्सवाचा एक भाग म्हणून दरवर्षी बन्नी उत्सव साजरा केला जातो. बन्नी उत्सवादरम्यान माला मल्लेश्वर स्वामींच्या मूर्तींवर दावा करण्यासाठी गावातील दोन प्रतिस्पर्धी गट काठीने मारामारी करण्याचा पारंपरिक खेळ खेळतात.
या खेळ्यादरम्यान दोन गटात काही कारणातून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात 70 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.