महाराष्ट्रात कोरोनाच्या युद्धात 70 पोलीस शहीद

402

जनतेची सुरक्षा करीत असताना कोरोनाच्या जाळय़ात सापडून राज्यभरात आतापर्यंत 70 पोलीस योद्धे शहीद झाले आहेत. शहिदांचा आकडा वाढतच असून, आज तारखेला सुमारे एक हजार 78 कोरोनाबाधित पोलीस उपचार घेत आहेत.

कोरोनाचा धोका काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कोरोनापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करीत आहेत; पण नागरिकांची सुरक्षा करताना पोलिसांनाच कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. आतापर्यंत हजारो पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत. मात्र, दुर्दैवाने 70 योद्धे शहीद झाले. त्यात पाच अधिकारी आणि 65 अंमलदारांचा समावेश आहे, तर एक हजार योद्धे कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांत 120 अधिकारी आणि 958 अंमलदारांचा समावेश आहे.

दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू

भोईवाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि राज्य राखीव पोलीस बलातील उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्य पोलीस दलात कोरोनाने पोलिसांच्या मृत्यूची संख्या हळूहळू वाढत चालली आहे.

मूळचे गोंदियाचे रहिवासी असलेले उपनिरीक्षक हे राज्य राखीव पोलीस बलाच्या ग्रुप 11मध्ये कार्यरत होते. एप्रिल-जून या काळात ते काही दिवस कल्याण येथे ड्युटीला होते. त्यानंतर ते घाटकोपर येथे ड्युटीला आले. त्रास होऊ लागल्याने त्यांची 25 जूनला कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. त्याच्यात कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने 28 जूनला पुन्हा त्यांची कोरोना चाचणी केली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. उपचारांसाठी परळच्या केईम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

तर, नायगाव पोलीस वसाहत येथे राहणारे सहायक उपनिरीक्षक हे भोईवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्रास सुरू झाल्याने नायर रुग्णालयात दाखल केले. मधुमेह आणि श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. उपचारांदरम्यान रविवारी रात्री त्यांचा नायर रुग्णालयात मृत्यू झाला.आतापर्यंत हजारो पोलीस कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत. मात्र, दुर्दैवाने 70 योद्धे शहीद झाले.

आपली प्रतिक्रिया द्या