नीरज देसाईविरोधात 709 पानांचे आरोपपत्र

6


सामना ऑनलाईन । मुंबई

हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी गुरुवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई यांच्या विरोधात हे 709 पानांचे आरोपपत्र आहे.

14 मार्च रोजी हिमालय पादचारी पूल कोसळून त्यात सहा पादचारी ठार तर 31 जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेला पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या डी. डी. देसाईज कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे समोर आल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी कंपनीचे प्रमुख नीरज देसाई यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पालिकेच्या तिघा अभियंत्यानाही गजाआड केले. दरम्यान, नीरज देसाई याच्या विरोधातील पहिले आरोपपत्र आझाद मैदान पोलिसांनी आज कोर्टात दाखल केले. आरोपपत्रात 80 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात जखमी, प्रत्यक्षदर्शी, जियो डायनामिक्स कंपनीचे अधिकारी, डी. डी. देसाई कंपनीचे अधिकारी तसेच पालिका अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या