मसुरीत एकाच वेळी धावल्या 71 लॅम्बोर्गिनी

मसुरी शहर म्हणजे, निसर्गाने नटलेले आणि शांत असलेले शहर आहे. परंतु, नुकताच मसुरीत एकाच वेळी रंगीबेरंगी रंगाच्या 71 लॅम्बोर्गिनी कार रस्त्यावरून धावल्या. लॅम्बोर्गिनी कारची किंमत कोटीच्या घरात आहे. शांत परिसरात या महागड्या कार धावताना पाहून येथील पर्यटक आश्चर्यचकित झाले. लॅम्बोर्गिनीचा रस्त्यावरचा ताफा अनेक पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. रंगीबेरंगी 71 लॅम्बोर्गिनी एका पाठोपाठ एक रस्त्यावरून धावत असताना अनेक जणांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला.