72 टक्के जनतेला ऑलिम्पिकचे आयोजन नकोय, जपानमधील सर्व्हेचा अहवाल

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट जगभरात आली. त्यामुळे टोकियो येथे होणारे ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले. त्यानुसार या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत हे टोकियो ऑलिम्पिक होणार आहे. पण कोरोनाचा कहर पुन्हा जगभरात सुरू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जपानमधील क्युडो न्यूजच्या सर्व्हेनुसार तेथील 72 टक्के जनतेचा टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला विरोध आहे.

टोकियो ऑलिम्पिकला आता 100 पेक्षा अधिक दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सर्व्हे करण्यात आला. यावेळी टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यात यावे असे 39.2 टक्के जनतेला वाटत आहे. तसेच 32.8 टक्के जनतेला वाटते आहे की, हे ऑलिम्पिक पुढे ढकलावे. 24.5 टक्के जनतेनेच टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे.

लसीच्या पुरवठय़ावर नाराजी

जपानमधील 92.6 टक्के जनतेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याची भीती वाटत आहे. तसेच जपानमध्ये सध्या 65 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील जनतेला लस देण्यात येत आहे. पण 60 टक्के जनता लसीकरणाच्या पुरवण्यावर नाराज आहे. त्यामुळेच आगामी ऑलिम्पिकवरही याचे पडसाद उमटवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या