भिवंडीतील बेकायदा ७५ इमारतींना सील

30

सामना ऑनलाईन । भिवंडी

कशेळी व काल्हेर परिसरातील एमएमआरडीएच्या जमिनीवरील ७५ निवासी बेकायदा इमारतींना आज सील ठोकण्यात आले. या इमारतींमध्ये कुणीही राहत नव्हते. पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ही धडक कारवाई केली असून या बेकायदा इमारती बांधणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ठाणे जिह्यातील सरकारी जागेवर उभारलेली बेकायदा बांधकामे तोडून टाकण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा व नियोजन समितीच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. कशेळी व काल्हेर या भागातील खारफुटी तोडून कुणाचीही परवानगी न घेता स्थानिक बिल्डरांनी इमारती बांधल्या. ज्या इमारती पूर्ण बांधून झाल्या आहेत त्या सरकार ताब्यात घेणार असून अर्धवट इमारती पंचनामे करून तोडण्यात येतील, अशी माहिती डॉ. थिटे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या