स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, रत्नागिरीत हेरिटेज वॉक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे.  याच्या जनजागृतीसाठी आज पोलीस कवायत मैदान ते टिळक स्मारक दरम्यान हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते.
लक्षवेधक वेशभूषेसह विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.  वॉकमध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव यांच्यासह जिल्हा परिषद तसेच पोलीस दल आणि महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय तसेच पटवर्धन हायस्कूल इतरही शाळांच्या मुलामुलींचा सहभाग या वॉकमध्ये होतो.  लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासह विविध वेशभूषेत विद्यार्थी यात सहभागी झाले होते.  शहरातील मार्गावरुन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान असलेल्या टिळक स्मारक येथे समारोप झाला.