76 वर्षीय तरुण तुर्काची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली दखल

सामना प्रतिनिधी । म्हसवड

 वयाची पंचाहत्तरी पार करूनही तरुणांना लाजवेल अशा ठणठणीत प्रकृतीचे धावपटू आणि ‘माणदेशी बोल्ट’ म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले म्हसवड येथील मुसाभाई मुल्ला यांना धावण्याच्या स्टॅमिन्याबद्दल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान देण्यात आले आहे. इंडिया बुकच्या वतीने नुकतेच मुसाभाईंना प्रशस्तिपत्र, मेडल, पेन, रेकॉर्ड होल्डरचा स्टिकर व बॅच देऊन सम्मानित करण्यात आले.

आज मुसाभाईंचे वय 76 हून अधिक आहे तरीही त्यांचा या वयातील धावण्याचा सराव पाहून कोणालाही त्यांचे कौतुक वाटेल असा आहे. मुसाभाई हे या वयातही 9 सेकंदांत 50 मीटर धावतात. अशा प्रकारे धावताना पाहून अनेकांनी त्यांना आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केले असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना अनेक तरुणांनी पसंती दिली आहे. याची दखल घेऊन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (फरिदाबाद, हरयाणा) मध्ये त्यांची नोंद घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या